पटना विद्यापिठाच्या वसतीगृहावर पोलिसांचा छापा; ‘गनपावडर’ जप्त !

पाटलीपुत्र (बिहार) – पोलिसांनी पटना विद्यापिठाच्या वसतीगृहावर छापा टाकून ‘गनपावडर’ जप्त करत अनेक तरुणांना अटक केली. हे तरुण पटेल वसतीगृहात रहातात. पोलिसांनी २६ जून या दिवशी पाटणा विद्यापिठाच्या सर्व वसतीगृहांवर छापे टाकले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून ते अधिक तपास करत आहेत.

‘गनपावडर’चा वापर कुठे-कुठे होतो ?

फटाके, बाँब, हँड ग्रेनेड आदी वस्तू आणि शस्त्रे बनवण्यामध्ये ‘गनपावडर’चा वापर केला जातो.