कतारहून आलेल्या नेपाळी मुसलमानाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण !
|
पाटलीपुत्र (बिहार) – मूळचा नेपाळ येथील रहाणारा आणि कतारमध्ये मजुरीचे काम करणार्या इजराइल नदाफ नावाच्या युवकाने राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील बांदीकुई येथील एका १३ वर्षीय मुलीला ‘इंस्टाग्राम’द्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला भेटण्यासाठी तो राजस्थानमध्ये आला आणि तिचे अपहरण केले. पोलिसांनी त्या दोघांना बिहारमधील दरभंगा येथून कह्यात घेतले. पोलिसांनी इजराइलला अटक करून मुलीला कुटुंबियांकडे सोपवले आहे.
Rajasthan: Israil Nadaf Mansuri pretends to be Instagram model, abducts 13-year-old girl through a gaming app, arrestedhttps://t.co/Jy6RsLxIsr
— OpIndia.com (@OpIndia_com) June 25, 2022
पोलिसांना अन्वेषणाच्या वेळी ‘पीडिता ‘फ्री फायर गेम’ हा ऑनलाईन खेळ खेळते’, हे कळाले. याची सखोल माहिती मिळवून त्या आधारे पोलिसांनी ‘सध्या ती कुठे आहे ?, हे शोधून काढले. त्याच भ्रमणभाषवरून ती एक विशिष्ट इंस्टाग्राम खाते पहात असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. ते खाते इजराइल नदाफ याचे होते. त्यावरून पोलिसांनी नदाफचा भ्रमणभाष क्रमांक मिळवून त्याला शोधून काढले. ते दोघेही जण बिहारच्या दरभंगा येथे आल्याचे कळताच पोलिसांनी दोघांना कह्यात घेतले.