गौतम अदानी यांच्या कुटुंबाकडून समाजकार्यासाठी ६० सहस्र कोटी रुपयांची देणगी !
नवी देहली – आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यावसायिक गौतम अदानी यांच्या ६० व्या जन्मदिनी त्यांच्या परिवाराने सामाजिक कार्यासाठी ६० सहस्र कोटी रुपयांची देणगी दिली. ही देणगी स्वास्थ्यासंबंधी सुविधा, शिक्षण आणि कुशलता विकास यांसाठी व्यय (खर्च) करण्यात येणार आहे.
#GautamAdani commits to donate Rs 60,000 crore to various charities related to healthcare, education, and skill development.@ParagonWorli18 reports#AdaniGrouphttps://t.co/bykL1DYFAf
— Business Standard (@bsindia) June 23, 2022
अदानी म्हणाले की, हे दान भारतीय आस्थापनांच्या दान देण्याच्या इतिहासातील सर्वांत मोठे दान आहे. ‘विप्रो’ आस्थापनाचे प्रमुख आणि प्रसिद्ध दानशूर अझीम प्रेमजी यांनी अदानी यांच्या देणगीला ‘महान’ असे संबोधले आहे.