एन्.आय.ए.कडून मिझोराममध्ये छापे
ऐझवाल (मिझोराम) – येथे काही मासांपूर्वी भारत आणि म्यानमार यांच्या आर्थिक चलनासह मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए’ने) ऐझवाल, चंपाई आणि कोलासिब या जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. ही स्फोटके पोलिसांनी हस्तगत केली होती. या प्रकरणी २१ जानेवारीला सायहा जिल्ह्यातील टिपा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. एन्.आय.ए.ने २१ मार्च या दिवशी पुन्हा हा गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले.