पालखीच्या मार्गावर १० सहस्र वृक्षांची लागवड करण्यात येणार !
जिल्हा परिषदेचे ‘हरित वारी’ अभियान
सोलापूर, २५ जून (वार्ता.) – जिल्हा परिषदेने आषाढी यात्रा कालावधीत ‘हरित वारी’ अभियान राबवण्याचा निर्णय घेतला असून याअंतर्गत पालखी मार्गावर १० सहस्र वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
आषाढी यात्रा नियोजनाविषयी बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिलीप स्वामी यांनी ‘हरित वारी’ उपक्रम राबवण्याचा निर्णय घेऊन त्याविषयीच्या सूचना दिल्या. पालखी मार्गावर हरित वारी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीचे कर्मचारी, गटविकास अधिकारी आणि उमेद अभियानातील तालुका स्तरावरील समन्वयक यांची ‘ऑनलाईन’ बैठक घेतली. पालखी मार्गावर ७४ गावांमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे.