विधानसभेच्या उपाध्यक्षांकडून शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटीस
उत्तर देण्यासाठी ४८ घंट्यांची समयमर्यादा
मुंबई – विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली आहे. यावर त्यांना उत्तर देण्यासाठी ४८ घंट्यांची समयमर्यादा देण्यात आली असून उत्तर न दिल्यास आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते.
नोटिशीला उत्तर दिले जाईल ! – आमदार भरत गोगावले
या नोटिशीविषयी बंडखोर आमदार भरत गोगावले एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देतांना म्हटले, ‘‘आम्हाला नोटीस देण्यात आलेली आहे. त्यांना उत्तर दिले जाईल. कुणाचेही निलंबन होणार नाही. न्यायालयात जाण्याची वेळ आली, तर तेही करावे लागेल. आम्ही अजूनही कोणत्याही पक्षात गेलेलो नाही आणि पक्ष सोडलेला नाही. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत.’’