एका राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असतांना पोलीस, प्रशासन आणि सरकारी यंत्रणा काय करत होत्या ? हे अतिक्रमण वाढण्यास उत्तरदायी असणार्या सर्वांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
बांगलादेशी घुसखोरांनी आसामच्या ६ सहस्र ६५२ चौरस किलोमीटर भूमीवर अतिक्रमण केले आहे. हे क्षेत्रफळ जवळपास २ गोवा राज्ये बसतील एवढे आहे. दरांग जिल्ह्यातील धौलपूर येथे अतिक्रमण करणार्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी गेलेले अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलीस यांच्यावर सहस्रो धर्मांध आंदोलनकर्त्यांनी आक्रमण केले. या आक्रमणामध्ये २ आक्रमक ठार, तर ११ पोलीस घायाळ झाले होते. या प्रकरणाच्या चौकशीनंतर ही माहिती समोर आली आहे. घुसखोरांनी प्राचीन मंदिरांच्या भूमींवर उघडपणे अतिक्रमण केले आहे.