मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार साजिद मीर याला पाकिस्तानमध्ये अटक
पाकने मीरचा मृत्यू झाल्याचा केला होता दावा !
नवी देहली – मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार साजिद मीर याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. परदेशी सरकारी संपत्तीची हानी करण्याचा कट रचणे, आतंकवाद्यांना साहाय्य करणे, अमेरिकेबाहेर एका नागरिकाची हत्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी बाँबस्फोट करणे या आरोपांवरून अमेरिकने मीर याला पसार आतंकवादी घोषित केले होते. मुंबईवरील, आक्रमणात ठार झालेल्या १६६ लोकांमध्ये ६ अमेरिकी नागरिक होते. अमेरिकेने त्याला पकडून किंवा माहिती देणार्याला ५० लाख डॉलरचे (५४ कोटी ७७ लाख रुपयांचे) बक्षीस घोषित केले होते. पाकिस्तानने नेहमीच साजिद मीर त्याच्या देशात असल्याचे नाकारले आहे. इतकेच नव्हे, तर त्याचा मृत्यू झाल्याचा दावाही पाकने केला होता.
Pakistan arrests Sajid Mir, the ‘dead’ mastermind of the 2008 Mumbai attacks who has suddenly come back to lifehttps://t.co/HepcAOaKh9
— OpIndia.com (@OpIndia_com) June 25, 2022
१. लाहोरमधील आतंकवादविरोधी न्यायालयाने मीर याला १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याला ४ लाखांहून अधिक रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ४५ वर्षांचा साजिद मीर याला एप्रिलमध्ये अटक करण्यात आली होती, तेव्हापासून तो लाहोरच्या कोट लखपत कारागृहात आहे.
२. पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकाकडून मीर याच्या शिक्षेविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. या शिक्षेची आणि न्यायालयीन कारवाईची माहितीही प्रसारमाध्यमांना नव्हती; कारण ती कारागृहाच्या आतील एका बंद खोलीत करण्यात आली होती. तेथे माध्यमांना जाण्याची अनुमती नव्हती.
३. मीर हा वर्ष २००५ मध्ये बनावट पारपत्रावर आणि बनावट नावाने भारतात आला होता.
संपादकीय भूमिकाअशा खोटारड्याला पाकवर भारताने आतातरी आक्रमण करून मुंबई आक्रमणाचा सूड उगवावा ! |