पूर्व युक्रेनमधील सेवेरोदोनेत्स्क येथून युक्रेनी सैनिकांना परत येण्याचा आदेश
कीव – युक्रेनियन सरकारने पूर्व युक्रेनमधील सेवेरोदोनेत्स्क येथील त्याच्या सैनिकांना परत येण्याचा आदेश दिला. रशियाकडून गेल्या काही आठवड्यांपासून त्या क्षेत्रात पुष्कळ बाँबवर्षाव करण्यात येत असल्याने हा आदेश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Russia has been concentrating its fire power on the east of the country for weeks, specifically on Severodonetsk.
Now, Ukrainian troops will be withdrawing from there, says the Luhansk regional governor — an effective surrender of the embattled city. https://t.co/4s2YnUDOSR
— The Washington Post (@washingtonpost) June 24, 2022
या निर्णयामुळे लुहांस्क प्रांतातील मोठा भाग रशियाच्या कह्यात जाणार आहे. लुहांस्क प्रांतात रशियन भाषा बोलणार्यांची संख्या लक्षणीय असल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची या प्रांतावर आधीपासून दृष्टी होती.