रोगावर खात्रीचा श्रेष्ठतम उपचार म्हणजे भगवंतावरची श्रद्धा !
परमात्म्यावर ज्याची पूर्ण श्रद्धा आहे, त्याचे रोग आणि आजार बरे होतात. रोगावर खात्रीचा श्रेष्ठतम उपचार म्हणजे भगवंतावरची श्रद्धा ! ‘उत्कट श्रद्धा असेल, तर रोग बरे होतीलच !’ योग हे विज्ञान आहे. योगामुळे गणितासारखे, संगणकासारखे (कॉम्युटरसारखे) बिनचूक उत्तर मिळते. ‘बाजूला हो’, असे पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण संकल्पाने म्हटले, तर पर्वतही हटेल, तर रोग हटणे का अशक्य आहे ? ‘अभिमंत्रित विभूती, मंत्र, तीर्थ यांनी रोग दूर होत नाहीत’, असे म्हणणे, ही ‘अंध अश्रद्धा’ आहे. आधुनिकांसाठी अश्रद्धा हीच श्रद्धा बनली आहे.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०१३)