पाकिस्तानने काश्मीरविषयी बोलू नये, अशी अमेरिकेची इच्छा !
पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा
अमेरिकेची इच्छा जरी नसली, तर पाकने काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याने त्याविषयी तोंड उघडूच नये !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – मी अमेरिकेच्या विरोधात नाही. मी अमेरिकेशी चांगले संबंध ठेवू इच्छित आहे; मात्र अमेरिकेला पाकचा वापर एका टिश्यू पेपर प्रमाणे करू देऊ शकत नाही. अमेरिकेची इच्छा आहे की, पाकिस्तानने इस्रायला मान्यता द्यावी आणि काश्मीरविषयी काही बोलू नये. असे केल्याने भारत अधिक भक्कम होऊन तो चीनला दुर्बल करू शकेल; कारण चीन अमेरिकेचा शत्रू आहे, असे विधान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. ‘पाकिस्तानचे सरकार अमेरिकेच्या दबावामुळे इस्रायल आणि भारत यांच्याशी संबंध सुधारू इच्छित आहे’, असा दावाही इम्रान खान यांनी या वेळी केला. ते एका संमेलनात बोलत होते.
सध्याचे शाहबाज शरीफ यांचे सरकार पाकिस्तानी सैन्य तळांना अमेरिकेला सोपवण्याचे वातावरण निर्माण करत आहे, असा दावाही त्यांनी केला.