पंढरपूर-निजामाबाद पॅसेंजरसह २८ रेल्वेगाड्या ८ दिवसांसाठी रहित !
सोलापूर – भुसावळ विभागाच्या मनमाड-अंकाई किल्ला रेल्वे स्थानकादरम्यान ‘यार्ड रिमोल्डिंग’ आणि दुहेरीकरण रेल्वे ट्रॅक जोडण्यासाठी ‘नॉन इंटरलॉकिंग’चे काम २३ जून ते ३० जून या कालावधीत होणार आहे. यासाठी ८ दिवसांचा ‘ब्लॉक’ (बंद) घेण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास २८ रेल्वेगाड्या रहित करण्यात आल्या असून, काही रेल्वे विलंबाने धावणार आहेत. साईनगर शिर्डी-काकिनाडा पोर्ट, सिकंदराबाद- साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, दौंड-निजामाबाद, पंढरपूर- निजामाबाद पॅसेंजर, पुणे- नागपूर यांसह अन्य रेल्वेगाड्या रहित करण्यात आल्या आहेत.
सिकंदराबाद-साईनगर शिर्डी ५० मिनिटे, काकिनाडा-साईनगर शिर्डी १५ मिनिटे, विजयवाडा- साईनगर शिर्डी ५० मिनिटे, जम्मूतावी-पुणे १ घंटा ५५ मिनिटे, काकिनाडा-साईनगर शिर्डी १ घंटा १५ मिनिटे, वास्को-द-गामा-हजरत निजामुद्दीन १० मिनिटे यांसह अन्य गाड्या विलंबाने धावणार आहेत.