संभाजीनगर येथे स्वेच्छानिवृत्त धर्मांध पोलिसाचे हिंदु पोलीस निरीक्षकांवर प्राणघातक आक्रमण !
आरोपी मुजाहेद शेख यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी
संभाजीनगर – स्वेच्छानिवृत्त पोलीस नाईक मुजाहेद शेख यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात केलेल्या प्राणघातक चाकू आक्रमणात जिन्सी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे गंभीर घायाळ झाले. त्यांची प्रकृती २२ जून या दिवशी स्थिर; मात्र चिंताजनक होती. त्यांना ‘अपेक्स’ रुग्णालयातून ‘एम्.जी.एम्.’ रुग्णालयात हलवण्यात आले. २१ जूनच्या रात्री केलेले शस्त्रकर्म यशस्वी न झाल्याने रक्तस्राव चालूच होता. सध्या त्यांच्यावर ‘एम्.जी.एम्.’ रुग्णालयामध्ये अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत. (धर्मांधांची क्रूर मानसिकता जाणा ! धर्मांध कोणत्याही क्षेत्रात असला, तरी क्रूरता सोडत नाही. तसेच धर्मांधांपासून पोलीस निरीक्षकही सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य जनतेने कुणाकडे पहायचे ? – संपादक)
२१ जून या दिवशी पोलीस निरीक्षक केंद्रे यांना जिन्सी पोलीस ठाण्यात ३ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त ‘गब्बर ॲक्शन कमिटी’च्या वतीने त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आरोपी शेख मुजाहेद यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन केंद्रे यांना शिवीगाळ करण्यास प्रारंभ केला. केंद्रे यांनी ‘शिवीगाळ का करत आहेस ?’, असे विचारताच शेख मुजाहेद यांनी खिशातील चाकू काढून ‘तुम को अब जिंदा नही छोडता’, असे म्हणत त्यांच्या पोटावर वार केला. या प्रकरणी आरोपीला २२ जून या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.