रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !
१. ‘आतापर्यंत मी आश्रमाला भेट दिल्याच्या प्रत्येक वेळी आश्रमातील आंतरिक शांतता देणाऱ्या शांतीचा स्तर वाढलेला असतो. येथील सकारात्मकतेमुळे माझा भाव जागृत होतो आणि मला भावावस्था अनुभवता येते. आश्रमात असतांना मिळालेले समाधान आणि आत्मीयता नंतर अनेक दिवसांपर्यंत टिकून रहाते. आश्रमातील कार्य असेच निरंतर चालू राहू दे. मी माझ्या वार्षिक भेटीची आतुरतेने वाट पहात असतो.’ – श्री. अनिल धीर (राष्ट्रीय महामंत्री, भारत रक्षा मंच), सत्यनगर, भुवनेश्वर, ओडिशा.
२. ‘आश्रमातील शिस्त, व्यवस्थापन, हिंदु संस्कृतीचे जतन आणि येथील चैतन्य वाखाणण्याजोगे आहे. हे सर्व माझ्या अपेक्षेच्या पलीकडील आहे. मला आश्रमाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे.’ – अधिवक्ता पुष्पराज कामत नावेलकर, डिचोली, गोवा.
३. ‘ज्येष्ठ सांगतात की, पृथ्वीवर स्वर्ग आहे; परंतु मी पाहिलेला स्वर्ग इथेच (आश्रमातच) आहे.’ – प्रेमा शेट्टी, दक्षिण कन्नड, कर्नाटक. (१२.६.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |