राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण !
मुंबई – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून कोश्यारी यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. २१ जूनच्या रात्री चाचणीतील अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आला.