पंचांगातील ‘ महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी होतील’, हे भविष्य खरे ठरले !
ज्योतिषशास्त्र नाकारणाऱ्या बुद्धीप्रामाण्यवादी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांना चपराक !
कोल्हापूर, २२ जून (वार्ता.) – भारतीय पंचांग हे भविष्याचे अचूक वेध घेणारे शास्त्र आहे. ते परिपूर्ण असून प्राचीन काळापासून भारतीय ते वापरतात. पंचांगामध्ये वर्तवले जाणारे भविष्य हे नेहमीच दिशादर्शक असते. यंदाही जून मासाच्या पंचांगात वर्तवण्यात आलेल्या भविष्यामधील अनेक भाग सत्य होतांना दिसत आहेत. यात प्रामुख्याने ‘चतुर्थातील शनी विरोधी पक्षाचे बळ वाढवणारा असून सत्ताधारी पक्ष अडचणीत येईल. काही राज्यांत सत्तांतर होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी होतील’, असे भविष्य सत्य झालेले दिसत आहे. श्री. सिद्धेश्वर मारटकर हे संपादक असलेल्या ‘ज्योतिष ज्ञान’ या पुस्तकात हे भविष्य प्रसिद्ध झाले आहे. पूर्ण वर्षाचे पंचांग हे वर्षभरापूर्वी प्रसिद्ध केले जाते. यावरून ज्योतिषशास्त्राची महानता लक्षात येते.