(म्हणे) ‘धर्माच्या आधारे समाजात फूट पाडणाऱ्यांपासून दूर रहा !’
पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांच्या पुनर्उभारणीवरून गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांना पोटशूळ !
चर्चमध्ये वरच्या श्रेणीत कार्यरत असलेल्या पाद्र्यांना ‘बिशप’ म्हणतात, तर ‘बिशप’च्या वर कार्यरत असणाऱ्यांना ‘आर्चबिशप’ म्हणतात.
पणजी – अलीकडच्या काळात लोकांमध्ये धार्मिक आधारावर फूट पाडण्यासाठी आणि इतरांच्या धर्माचा अनादर वाढवण्यासाठी फुटीरतावादी शक्ती हळूहळू डोके वर काढत आहेत. आपण सक्रीयपणे आणि विवेकाचा वापर करून या वाईट गोष्टींपासून दूर रहाणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्व धर्म सन्मानाने आणि सद्भावनेने जगतील, असे विधान गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांनी केले आहे.
पोर्तुगिजांनी गोव्यात उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या ठिकाणी चर्च उभारले. या मंदिरांच्या पुनर्उभारणीच्या संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने कृती आरंभली आहे, तसेच फोंडा येथे झालेल्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनीही या मागणीला जोरदार पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आर्चबिशप फेर्राव यांनी हे वक्तव्य केले आहे.
आर्चबिशप फेर्राव पुढे म्हणाले, ‘‘विविध धार्मिक परंपरा असलेले गोव्यातील लोक प्राचीन काळापासून धार्मिक सलोखा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. (प्राचीन काळापासून गोव्यात ख्रिस्ती नव्हे, तर हिंदूच रहात होते. पोर्तुगिजांनीच गोव्यात येऊन हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले आणि धार्मिक सलोखा बिघडवला आहे. हा स्पष्ट इतिहास असतांना धार्मिक सलोख्याचे श्रेय घेणारे आर्चबिशप फेर्राव ! – संपादक) आजच्या परिस्थितीत स्वतःच्या धार्मिक परंपरांचा विचार न करता आंतरधर्मीय संवाद आणि इतर उपक्रम यांसाठी एकत्र येणे अत्यंत महत्त्वाचे आहे.’’ (गोमंतकातील हिंदू जागृत होऊन त्यांच्या श्रद्धास्थानांविषयी आवाज उठवत असल्याने आर्चबिशप यांना पोटशूळ तर उठला नाही ना ? – संपादक) आर्चबिशप यांना ‘व्हॅटिकन’ने नुकतेच ‘कार्डिनल’ हे पद दिले आहे. या वेळी आर्चबिशप यांनी जंगलतोड रोखून वनीकरण करण्याविषयीही सांगितले.
संपादकीय भूमिका
|