पैगंबरावरील विधानामुळे भारताच्या प्रतिमेला हानी पोचली ! – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल
नवी देहली – भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक राज्यांत हिंसाचार झाला, तर इस्लामी देशांतून भारताचा निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ‘या वक्तव्यांमुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक अशी प्रतिमा सिद्ध झाली आहे, जी मुळातच नाही. आता एक पर्याय उरला आहे की, आपण आपली बाजू मांडायची. आम्ही देशांतर्गत आणि देशाबाहेर ज्यांना ज्यांना भेटतो, त्यांना आमची बाजू पटवून देण्यात यश आले आहे’, असे एका मुलाखतीत सांगितले.
‘India’s image has been hit by this.’ NSA #AjitDoval opens up on #NupurSharmaControversy#ProphetMuhammadRow https://t.co/5vu9uplJBS
— Zee News English (@ZeeNewsEnglish) June 22, 2022
संपादकीय भूमिकापाकिस्तान, बांगलादेश, तसेच आखातातील इस्लामी देश अल्पसंख्यांकांचा छळ करतात, तसेच हिंदूंचा वंशसंहार करतात, तरी ते त्यांच्या प्रतिमेचा कधी विचार करत नाहीत आणि भारतही त्यांना यावरून जाब विचारत नाही, याविषयी कोण बोलणार ? |