माऊलींच्या हिरा-मोती अश्वांचे आळंदीत देवस्थानच्या वतीने परंपरागत स्वागत !
आळंदी (जिल्हा पुणे) – माऊलींच्या पालखी सोहळ्यातील प्रथापरंपरांचे पालन करत श्रींचे मानाचे हिरा आणि मोती हे अश्व अंकली बेळगाव येथून अलंकापुरीत हरिनाम गजरात आले आहेत. पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी श्रींच्या अश्वांचे स्वागत केले.
आळंदीतील बिडकर वाड्यातील विश्रांती विसाव्याच्या वेळी माऊलींच्या मंदिरात अश्व आळंदीसमीप आल्याचा निरोप मिळताच श्री गुरुहैबतरावबाबा यांच्या दिंडीने प्रथा परंपरेने अश्वांचे स्वागत आणि पूजा केली. या वेळी अश्वसेवेचे मानकरी ऊर्जितसिंह शितोळे सरदार, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई आदी उपस्थित होते.