मुंबईसह कोकणाला ५ दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ !
मुंबई – हवामान विभागाने २० आणि २१ जून या दिवशी मुंबईसह उपनगरासाठी अन् २० ते २३ जून या कालावधीत कोकणासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ घोषित केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून १९ जूनपासून गुजरात, मध्यप्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, छत्तीसगड, बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागांत पुढे सरकला आहे.