भारत, अमेरिका, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात यांनी बनवला स्वतंत्र गट !
नवी देहली – भारत, अमेरिका, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात यांनी एक नवीन गट बनवला आहे. याचे नाव ‘आय२यू२’ असे ठेवण्यात आले आहे. यातील ‘आय-२’चा अर्थ आहे इंडिया आणि इस्रायल, तर ‘यू-२’चा अर्थ आहे युएस् (युनायटेड स्टेट्स) आणि यूएई (युनायटेड अरब अमिरात) असे आहे. १२ ते १६ जुलैच्या कालावधीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पश्चिम आशियाच्या दौर्यावर येणार आहेत. तेव्हा या गटाची पहिली ‘ऑनलाईन’ बैठक होणार आहे.
याविषयी परराष्ट्र प्रकरणांचे तज्ञ डॉ. आदित्य पटेल यांनी सांगितले की, या गटामुळे भारत, इस्रायल, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिका एकमेकांच्या फार जवळ येतील. यामुळेच चीन घाबरला आहे.