(म्हणे) ‘नरेंद्र मोदी हे हिटलरपेक्षाही पुढे गेल्याने हिटलर प्रमाणे मरतील !’

काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांचे आक्षेपार्ह विधान !

काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय

रांची (झारखंड) – मला वाटते की मोदी हिटलरपेक्षाही पुढे गेले आहेत. हिटलरनेही सैन्यामध्ये ‘खाकी’ नावाची एक संस्था स्थापन केली होती. मोदी हिटरलच्या मार्गाने चालत आहेत. त्यामुळे हिटलरप्रमाणेच त्यांचा मृत्य होईल. हे लक्षात ठेवा, असे विधान काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांनी येथे अग्नीपथ योजनेच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये केले.

संपादकीय भूमिका

  • पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी विरोध करणारे काँग्रेसवाले या विधानावर गप्प का ? कि मोदी यांच्याविषयी काहीही बोलले, तरी ते योग्यच आहे, असे त्यांना वाटते ?
  • मोदी हिटलर प्रमाणे वागत असते, तर त्यांचा एकतरी विरोधक जिवंत राहिला असता का ? आणि सहाय असे विधान करू शकले असते का ?