‘अग्नीपथ’च्या विरोधात ‘भारत बंद’चे आवाहन : ५०० हून अधिक रेल्वे गाड्या रहित
नवी देहली – संरक्षण मंत्रालयाच्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात २० जून या दिवशी अनेक संघटनांनी ‘भारत बंद’चे आवाहन केले होते. त्याला देशात तुरळक प्रतिसाद मिळाला. उत्तर भारतात काही ठिकाणी रेल्वेगाड्या रोखण्यात आल्याने ५०० हून अधिक गाड्या रहित कराव्या लागल्या. यात १८१ एक्सप्रेस आणि ३४८ पॅसेंजर गाड्या यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देहलीतील शिवाजी ब्रिज स्थानकावर रेल्वेगाडी रोखून धरली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. बंदमुळे देहलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आदी राज्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्या होते.
भारत बंद: ‘अग्निपथ’ के विरोध ने रोकी रफ्तार, 500 से ज्यादा ट्रेनें रद्द; यात्री परेशान#BharatBandh #Agnipath #AgnipathScheme #AgnipathProtests https://t.co/lgSNHWHtIC
— Hindustan (@Live_Hindustan) June 20, 2022
संपादकीय भूमिकासर्वोच्च न्यायालयाने बंदचे आवाहन करणार्यांकडून दंड वसूल करण्याचा आदेश दिलेला असतांनाही असे आंदोलन करणार्या संघटनांवर बंदीच घातली पाहिजे ! |