दिंडी सोहळ्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातात वारकऱ्याचा मृत्यू

३० जण गंभीर घायाळ

अपघातस्थळीचे दृश्य

सातारा, १९ जून (वार्ता.) – पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावाच्या सीमेत दिंडी सोहळ्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीला आयशर टेम्पोने मागून जोरदार धडक दिली. त्यात मायाप्पा कोंडिबा माने या वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून ३० वारकरी गंभीर घायाळ आणि इतर किरकोळ घायाळ झाले आहेत. ही घटना १९ जूनच्या पहाटे ३ वाजता घडली. कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले, लाहोटे येथील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा चालू होता. दिंडी सोहळ्यात एकूण ४३ वारकरी प्रवास करत होते.

धडक एवढी भीषण होती की, ट्रॉलीतील सर्व वारकरी हवेत फेकले गेले. घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले. अपघातामुळे ४ घंटे वाहतूक खोळंबली.