देहली येथील अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा यांना त्यांची मुलगी कु. सिमरन (वय १३ वर्षे) हिच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
१. एका जिज्ञासूंना अर्पणाचे महत्त्व सांगणे
काल मी एका जिज्ञासूंना अर्पणाविषयी सांगत होते. तेव्हा ते जिज्ञासू मला म्हणाले, ‘‘माझ्या मित्राने अर्पण दिले आहे. ‘ते मीच केले आहे’, असे तुम्ही समजा.’’ त्यावर मी त्यांना म्हणाले, ‘‘तुमच्या मित्राने भोजन केल्यावर त्याचे पोट भरेल कि तुमचे ? तुम्हाला तुमचे पोट भरण्यासाठी स्वतःच भोजन करावे लागेल ना ?’’
२. जिज्ञासूंशी झालेला संवाद ऐकून कु. सिमरन हिची झालेली विचारप्रक्रिया !
आमचे हे संभाषण माझी मुलगी कु. सिमरन (वय १३ वर्षे) ऐकत होती. त्यानंतर आम्हा दोघींमध्ये पुढीलप्रमाणे संभाषण झाले.
कु. सिमरन : आई, मीसुद्धा मला खाऊसाठी मिळालेले पैसे अर्पण करू शकते का ?
अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा : तुझे पैसे राहू दे. मी अर्पण केले आहे.
कु. सिमरन : तू भोजन केलेस, तर त्याने तुझे पोट भरेल कि माझे ? माझे पोट भरण्यासाठी मला स्वतःलाच जेवावे लागेल ना !
तिचे हे बोलणे ऐकून आणि तिच्या मनातील भाव जाणून माझे डोळे भरून आले. मी तिला अर्पण देण्यापासून रोखू शकले नाही.
३. ‘माझ्याकडील सर्व पैसे अर्पण करावेत’, असे मला वाटते’, असे सांगणारी कु. सिमरन !
कु. सिमरन : मी किती अर्पण करू ?
अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा : तुला जेवढे करायची इच्छा आहे, तेवढे कर.
कु. सिमरन : मला तर वाटते, ‘माझ्याकडचे सर्व पैसे अर्पण करावेत.’ हे पैसे मला काय करायचे आहेत ? जेव्हा मला लागतील, तेव्हा मी तुझ्याकडून घेईन. तू माझ्या जवळच आहेस ना !
तिचे हे बोलणे ऐकून मला जाणीव झाली, ‘मी माझे सर्वस्व अर्पण करू शकेन, एवढी माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा आहे का ?’ या प्रसंगाने मला अंतर्मुख केले.
– अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा, देहली (६.३.२०२१)