(म्हणे) ‘पंतप्रधानांनी नूपुर शर्मा यांचे वक्तव्य योग्य कि अयोग्य, याविषयी बालमित्र अब्बास यांना विचारावे !’ – ओवैसी
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नूपुर शर्मा यांच्या महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेले वक्तव्य योग्य आहे की अयोग्य, हे त्यांचे बालमित्र अब्बास यांना विचारावे, अशी टीका ‘एम्.आय.एम्.’चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली. पंतप्रधान मोदी यांच्या आईच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लहानपणीच्या आठवणींविषयी एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांचा बालमित्र असलेला अब्बास यांचा उल्लेख केला आहे. यावरून आता ओवैसी यांच्याकडून राजकारण केले जात आहे.
PM मोदी अपने दोस्त Abbas से पूछ लीजिए कि जो Nupur Sharma ने जो बोला वो गलत है या नहीं : @asadowaisi #Abbas #अब्बास pic.twitter.com/BvgRQBUIwO
— News24 (@news24tvchannel) June 19, 2022
संपादकीय भूमिकाइतरांचे वक्तव्य योग्य कि अयोग्य हे पडताळण्याऐवजी ओवैसी यांनी त्यांच्या धर्मबांधवांकडून केली जाणारी चिथावणीखोर वक्तव्ये आणि करण्यात येणार्या दंगली याविषयी प्रथम स्पष्टीकरण द्यावे ! |