काही देश वहात्या गंगेमध्ये हात धुऊन घेण्याचा प्रयत्न करत आहेत ! – विदेशमंत्री
नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याला इस्लामी देशांनी विरोध केल्याचे प्रकरण
नवी देहली – नूपुर शर्मा यांनी महंमद पैंगबर यांच्यासंदर्भात केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीवर अनेक इस्लामी देशांनी भारतावर टीका केली होती. यावर विदेशमंत्री एस्. जयशंकर यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘‘ती टिप्पणी भारत सरकार अथवा भाजप या दोघांची भूमिका नव्हती. तसेच भाजपने त्या टिप्पणीच्या विरोधात कारवाईही केली आहे. या टिप्पणीमुळे लोकांची संवेदनशीलता आणि समज यांवर प्रभाव पडला होता.’’ जयशंकर यांनी कोणत्याच देशाचे नाव न घेता, ‘काही लोक वहात्या गंगेमध्ये हात धुऊन घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या असेही लोक आहेत, जे स्वत:चा लाभ करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत’, असे वक्तव्य केले.
Speaking at the CNN-News18 Town Hall, External Affairs Minister S Jaishankar said the remarks did not reflect the views of either the BJP or the government and that the party took clear action on the issue.https://t.co/ZKct4C2hrj
— News18 (@CNNnews18) June 19, 2022