शौर्याहून श्रेष्ठ काहीही नाही !
महाभारतात म्हटले आहे, ‘शौर्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही.’ आमच्या प्रत्येक अवताराने शौर्यपूर्वक युद्ध करून तत्कालीन रावण-कंस यांसारख्या समाजावरील संकटांना दूर केले. समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘धटासी व्हावे धट, उद्धटासी उद्धट ।’ त्यांनी जी बलोपासना सांगितली, ती हिंदूंनी शौर्य गाजवण्यासाठीच ! जेव्हा बलोपासनेद्वारे हिंदु मावळे जागृत झाले, तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली पाच पातशाह्या, म्हणजे आजचे ‘इस्लामिक स्टेट’ पायदळी तुडवत हिंदवी स्वराज्याचा झेंडा डौलाने फडकावला. जेव्हा हिंदू जागृत झाले, तेव्हा स्वतःला जगत्जेत्ता म्हणवणाऱ्या सिकंदरालाही सिंधु नदी ओलांडता आली नाही ! अशा किती शौर्यकथा हिंदूंना सांगाव्यात ? पण ही हिंदूंच्या शौर्याची परंपरा शिकवली जात नाही; कारण हिंदूंनी शौर्य गाजवणे आणि शक्तीशाली बनणे, हे राष्ट्रद्रोही शक्तींना नको आहे.