अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
‘१३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस शिष्यासाठी अविस्मरणीय असतो. या दिवशी गुरूंचा कृपाशीर्वाद आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे शब्दातीत ज्ञान नेहमीच्या तुलनेत सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुसेवा अन् धनाचा त्याग करणाऱ्याला गुरुतत्त्वाचा लाभ सहस्रपट अधिक होतो.
१. शिष्याच्या जीवनातील गुरूंचे महत्त्व !
निर्गुण परमेश्वराचे पृथ्वीतलावर कार्यरत असणारे सगुण रूप म्हणजेच गुरु ! गुरु शिष्याला ज्ञान देऊन त्याची पारमार्थिक उन्नती होण्यासाठी अखंड झटत असतात. त्यामुळे शिष्याला गुरूंविना तरणोपाय नसतो. ‘शिष्याने गुरूंना सर्वस्व अर्पून त्यांची सेवा करणे’, हीच खरी गुरुदक्षिणा असते. त्यामुळे शिष्यावर गुरुकृपेचा ओघ अखंड रहातो.
२. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुकार्यासाठी, म्हणजेच धर्मकार्यासाठी अर्पण करा !
या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सर्वांना लाभली आहे. त्यामुळे जिज्ञासू, तसेच हितचिंतक यांनी ‘धर्मप्रसाराचे कार्य करणे आणि त्यासाठी धन अर्पण करणे’, यांद्वारे गुरुपौर्णिमेचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्यावा.
सध्या धर्मग्लानीचा काळ असल्याने ‘धर्मप्रसाराचे कार्य करणे’, ही काळानुसार सर्वश्रेष्ठ साधना आहे. त्यामुळे धर्मप्रसाराचे कार्य करणारे संत, संस्था किंवा संघटना यांच्या कार्यासाठी धन दान करणे काळानुसार आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सनातन संस्था हे कार्य अत्यंत निःस्वार्थीपणे करत आहे. त्यामुळे अर्पणदात्यांनी सनातन संस्थेला केलेल्या अर्पणाचा विनियोग निश्चितच धर्मकार्यासाठी होणार आहे.
अर्पण करण्यास इच्छुक असलेल्यांनी सौ. भाग्यश्री सावंत यांना ७०५८८८५६१० या क्रमांकावर वा sanatan.sanstha2025@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.
गुरुपौर्णिमेसाठी घरबसल्या ‘ऑनलाईन’ अर्पण करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यासाठी https://www.sanatan.org/en/donate या मार्गिकेला भेट द्या !’
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (१२.६.२०२२)