भारत सरकारने क्षमा मागण्याविषयीचे अधिकृत पत्र कतार सरकारने मागे घ्यावे, अन्यथा आंदोलन करू !
|
मुंबई – कतारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या ‘प्रेषित महंमद यांच्या अवमान प्रकरणी भारत सरकारने जाहीर क्षमा मागावी’, हे अधिकृत पत्र कतार सरकारने तात्काळ मागे घ्यावे, या मागणीसाठी मुंबई येथील कतारच्या महावाणिज्य दूतावासाच्या कार्यालयाबाहेर २४ जून या दिवशी दुपारी २ वाजता निदर्शने करण्याची चेतावणी ‘हिंदु टास्क फोर्स’ने दिली.
कतारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कतारमधील भारतीय सरकारचे राजदूत डॉ. दीपक मित्तल यांना पाचारण करून त्यांच्याकडे एक अधिकृत पत्र सुपुर्द केले. त्यात ‘प्रेषित महंमद यांच्या विरोधात भारतातील सत्ताधारी पक्षाच्या एका सदस्याने केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भारत सरकारने या प्रकरणी जाहीर क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.
या पत्रात म्हटले आहे,
१. भगवद्गीतेच्या शिकवणीनुसार भारत सतत एकता, आंतरराष्ट्रीय बंधुता आणि शांतता यांसाठी उभा राहिला आहे. हिंदु देवता आणि भारतामाता यांचे अश्लील चित्र रेखाटून हिंदूंच्या भावना दुखावणार्या चित्रकार म.फि. हुसेन यांना कतारने नागरिकत्व दिले होते; मात्र हिंदु देवतांचा अवमान करणार्यांविषयी कधीही क्षमा मागितली नाही. यामुळे कतारचे हे अधिकृत पत्र जारी करण्याचे वरील कृत्य ढोंगी कृत्य आहे.
२. संपूर्ण जग इस्लामिक देशांनी निर्माण केलेल्या आतंकवादाचे बळी ठरले आहे; परंतु कतारने त्याचा कधीही साधा निषेधही केला नाही.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? भारत सरकारच कतारला पत्र मागे घेण्याविषयी का खडसावत नाही ? |