अयोध्येतील श्रीराममंदिर ट्रस्टला देण्यात आलेले २ सहस्र धनादेश वटलेच नाहीत !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराममंदिरासाठी देशभरातून देणगी गोळा करण्यात आली. यात काही जणांनी रोख रक्कम, तर काही जणांनी धनादेशाद्वारे देणगी दिली. ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’कडे जमा झालेल्या धनादेशांपैकी अनुमाने २ सहस्र धनादेश वटले गेले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
देणगीच्या नावाने 'चुना' २२ कोटींचा चुना; अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टला देण्यात आलेले २००० चेक बाऊन्स https://t.co/jUcy889Z0T#RamMandir #Ayodhya #Fraud #RamTemple
— Maharashtra Times (@mataonline) June 15, 2022
या धनादेशांच्या माध्यमातून जवळपास २२ कोटी रुपयांची देणगी देण्यात आली होती; मात्र हे धनादेश न वटल्यामुळे ही रक्कम ट्रस्टकडे जमा होऊ शकली नाही. विश्व हिंदु परिषदेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार श्रीराममंदिरासाठी आतापर्यंत जवळपास ३ सहस्र ४०० कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकामंदिरासाठी अर्पण देतांनाही फसवणूक करणारे जन्महिंदू जनतेला किती फसवत असतील ? |