उत्तरप्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यात हिंसक निदर्शने : दुचाकी, बस आणि जीप जाळल्या
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात उत्तरप्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी हिंसक निदर्शने करण्यात आली. १८ जूनला सकाळी शेकडो तरुण रस्त्यावर उतरले. बदलापूर आणि लाला बाजार येथे आंदोलकांनी अनेक दुचाकी, २ बस आणि जीप जाळल्या. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि नंतर हवेत गोळीबार केला.
‘अग्निपथ’ विरोध: यूपी में दूसरे दिन भी हिंसा जारी, बस और जीप में लगाई आग, पुलिसकर्मियों पर बरसाए पत्थर #Agnipath #AgnipathRecruitmentScheme #AgniveerScheme #Agniveerprotest #UttarPradesh https://t.co/CcdPqC7gDo
— Asianetnews Hindi (@AsianetNewsHN) June 18, 2022
राज्याचे माहिती आयुक्त प्रमोद तिवारी यांना घेऊन जाणार्या पोलिसांच्या वाहनावर बदलापूरजवळ दगडफेक करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव आणि पोलीस शिपाई राम यादव घायाळ झाले. जौनपुर-प्रयागराज महामार्गावर बराच वेळ वाहतूक खोळंबली होते. बदलापूर येथे अनेक ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक केली.