पावागड (गुजरात) येथील श्री कालिकामाता मंदिराचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन  

५०० वर्षांनंतर मंदिरावर फडकला ध्वज !

पावागड (गुजरात) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावागड डोंगरावरील पुनर्विकसित श्री कालिकामाता मंदिराचे उद्घाटन केले. या मंदिराच्या कळसावर ५०० वर्षांनंतर ध्वज फडकावण्यात आला. मुसलमान आक्रमकांनी येथे मंदिराच्या ठिकाणी दर्गा बांधला होता. तो हटवून येथे पुन्हा मंदिर बांधण्यात आले आहे.

या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की,  आज काही शतकांनंतर मंदिरांच्या कळसावर पुन्हा ध्वज फडकत आहे. हा ध्वज केवळ आमची श्रद्धा आणि अध्यात्म यांचेच प्रतीक नाही, तर शतके, युगे पालटतात; मात्र श्रद्धेचा कळस शाश्‍वत रहातो, याचे प्रतीक आहे.