रहावा मस्तकी सद्गुरूंचा अखंड वरदहस्त ।
सद्गुरु (टीप १) उघडती कवाड मनाचे ।
दर्शन करावया भगवंताचे ।। १ ।।
भगवंताला पाहोनिया आनंद वाटे मना ।
सापडला परी जन्म जन्मांतरीचा सखा ।। २ ।।
भगवंत दिसता मनासी होई जाणीव ।
सद्गुरुच असती भगवंताचे रूप सगुण ।। ३ ।।
सद्गुरूंची लीला अवर्णनीय असे ।
अनुभवता होई सार्थक जन्माचे ।। ४ ।।
रहावा मस्तकी सद्गुरूंचा अखंड वरदहस्त ।
त्यांच्या दिव्य लीला अनुभवण्या करावे मज पात्र ।। ५ ।।
टीप १ – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
– कु. देवदत्त व्हनमारे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), देहली सेवाकेंद्र (१५.२.२०२२)