महापालिकेच्या शाळा क्रमांक १ च्या ‘डिजिटल वर्गा’चे लोकार्पण !
सांगली, १७ जून (वार्ता.) – ‘ॲप्रोच हेल्पिंग हँड फाऊंडेशन’च्या एका उपक्रमाच्या अंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या शाळा क्रमांक १ मधील सिद्ध करण्यात आलेल्या अद्ययावत ‘डिजिटल वर्गा’चे उद्घाटन महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले. या ‘डिजिटल वर्गा’त संगणक संच, डिजिटल क्लास बोर्ड, साऊंड सिस्टीम, बॅटरी बॅकअप, मायाजाळ सेवा यांसह विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आधुनिक बाक, ‘प्रोजेक्टर’ असे साहित्य ‘ॲप्रोच’कडून पुरवण्यात आले आहे.