लैंगिक अत्याचार करून पसार झालेल्या मुसलमानास २ वर्षांनंतर ठाणे पोलिसांकडून अटक !
ठाणे, १७ जून (वार्ता.) – मुंब्रा येथील २४ वर्षीय विवाहितेवर बलात्कार करणार्या रफीक खान (वय ३० वर्षे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नालासोपारा येथून अटक केली आहे. मागील २ वर्षांपासून तो ठाणे पोलिसांना हुलकावणी देत होता. त्याने पीडित महिलेला तिचे अश्लील चित्रीकरण आणि छायाचित्र काढल्याचे सांगत तो धमकावत होता. झालेल्या प्रकाराची वाच्यता केल्यास भ्रमणभाषसंचातील चित्रीकरण पती आणि नातेवाइक यांना दाखवण्याची धमकीही त्याने दिली. तो तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. तिने विरोध केल्यास त्याने शिवीगाळ आणि मारहाणही केली. या सर्वच प्रकाराला कंटाळून तिने मुंब्रा पोलीस ठाण्यात नोव्हेंबर २०२० मध्ये तक्रार प्रविष्ट केली होती. (महिलांनो, धर्मांधांच्या वासनांधतेला बळी न पडता त्यांचा वेळीच प्रतिकार करा ! – संपादक)