‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’निमित्त रामनाथी आश्रमात येऊन सेवेतील आनंद  घेणारे उजिरे (कर्नाटक) येथील श्री. सुंदर एम्.के. !

मी गेली ११ वर्षे प्रसाराची सेवा करत आहे. अनेक वेळा मला ‘रामनाथी आश्रमात जाऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन घ्यावे’, असे वाटते. या वेळी या घोर आपत्काळात मला दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने रामनाथी आश्रमात येऊन सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. ‘असे भाग्य मला लाभेल’, असे मला वाटले नव्हते.

१. ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’निमित्त रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाली’, याचा आनंद होणे

उजिरे (कर्नाटक) येथील साधकांचा मला भ्रमणभाष आला. त्यांनी मला विचारले, ‘‘१२.६.२०२२ या दिवशी चालू होणार्‍या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’निमित्त तुम्ही रामनाथी (गोवा) येथील आश्रमात जाऊ शकता का ?’’ त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला. मला रामनाथी आश्रमात जाण्यासाठी नेहमी अडचण येते. या वेळी ‘काही झाले, तरी जायचेच’, असे मी ठरवले.

२. ‘अधिवेशनाच्या पाच दिवस आधी जावे’, असे वाटणे आणि चार दिवस आधी येण्याचा निरोप मिळाल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आधीच विचार दिला’, याची अनुभूती येणे

मी ९.६.२०२२ या दिवशीच्या रेल्वेच्या तिकिटाचे आरक्षण केले; परंतु ‘अधिवेशनाच्या ५ दिवस आधी जाण्याची सिद्धता करावी’, असे मला वाटत होते; परंतु त्याच दिवशी रात्री कपड्यांना इस्त्री करून बॅग भरून ठेवली. सकाळी उठल्यावर मी साधकांना भ्रमणभाष करून माझ्या सिद्धतेविषयी सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्हाला आजच रामनाथीला जायचे आहे.’’ मला अधिवेशनाच्या ४ दिवस आधीच रामनाथीला येण्याची संधी मिळाल्याने पुष्कळ आनंद झाला. ‘गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला आधीच मनात विचार दिला’, याची मला अनुभूती आली.

३. ‘साधना हेच अंतिम ध्येय आहे’, याची जाणीव होणे

माझा विवाह होऊन १० वर्षे झाली. आम्ही पती-पत्नी एकत्र असतांना ती मला साधनेत साहाय्य करायची. नंतर तिने मला सांगितले, ‘‘तुम्ही साधना करा. मी माझ्या घरी जाते.’’ मी त्याबद्दल चिंता करत नाही. ‘साधना हेच माझे अंतिम ध्येय आहे’, याची मला जाणीव झाली आहे. आता मी सेवाच करत आहे. आश्रमात सेवा करतांना माझा पुष्कळ भाव जागृत होतो.

– श्री. सुंदर एम्.के., दक्षिण कन्नड, कर्नाटक. (१२.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक