राहुल गांधींच्या ईडी चौकशीमुळे पुण्यात काँग्रेसचे आंदोलन !
पुणे – नॅशनल हेराल्ड आर्थिक अपव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. मागील २ दिवसांपासून राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावले जात आहे. १७ जूनलाही त्यांना पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे. त्यामुळे येथील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकार, तसेच भाजपविरोधात घोषणा दिल्या आणि टायर पेटवून ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसह पदाधिकार्यांना कह्यात घेतले आहे.