कुवैतमधील ५० पैकी ३० खासदारांची भारतावर कठोर कारवाईची मागणी

कुवैत सिटी (कुवैत) – नूपुर शर्मा प्रकरणी कुवैतमधील ३० खासदारांनी भारताच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी कुवैत सरकारकडे केली आहे. यासाठी भारतावर सर्व प्रकारचा दबाव निर्माण करण्याची मागणी केली आहे. या खासदारांनी भारतातील मुसलमानांना त्यांचा भाऊ संबोधत ही मागणी केली. कुवैतच्या संसदेत एकूण ५० खासदार आहेत.

या खासदारांनी भारतातील मुसलमानांवर होणारी आक्रमणे, त्यांच्यावर पोलिसांकडून होणारी कारवाई आदींचा निषेध केला आहे. त्यांनी भारतातील मुसलमानांना संरक्षण पुरवण्याची मागणीही केली. यासह कुवैत सरकार, आणि अन्य देशांनी भारतावर राजकीय, आर्थिक दबाव निर्माण करण्याचे आवाहनही केले.

संपादकीय भूमिका

भारतातील किती हिंदु खासदार इस्लामी देशांतील हिंदूंवर होणार्‍या हिंदु धर्मावरील आघातांविषयी अशी मागणी भारत सरकारकडे करतात ?