पाकिस्तान ‘एफ्.ए.टी.ए.’च्या करड्या सूचीतून बाहेर !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – फायनॅन्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (‘एफ्.ए.टी.ए.’ने) पाकिस्तानला तिच्या करड्या (ग्रे लिस्ट) सूचीमधून बाहेर काढले आहे. त्यामुळे आता पाकवर घालण्यात आलेले सर्व आर्थिक निर्बंध हटवण्यात आले आहेत. जर्मनीची राजधानी बर्लिन येथे एफ्.ए.टी.ए.च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला; मात्र याची अधिकृत घोषणा ऑक्टोबरमध्ये करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले आहे. जिहादी आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करणे, त्यांच्यावर कारवाई न करणे आदी कारणांमुळे पाकला गेल्या काही वर्षांपासून करड्या सूचित टाकण्यात आले होते. पाकला पुढे काळ्या सूचित टाकण्याचीही शक्यता असतांना आता त्याला करड्या सूचीतून बाहेर काढण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. (यावरून ‘एफ्.ए.टी.ए.’ने पाकला करड्या सूचित टाकण्याची केलेली कारवाई तोंडदेखली होती, हेच स्पष्ट होते. अशा संस्थेला भारताने जाब विचारला पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

पाकिस्तानने आतंकवादाविरोधात काहीही पावले उचलली नसतांना  ‘एफ्.ए.टी.ए.’कडून असा निर्णय घेणे आश्‍चर्यकारकच होय ! एफ्.ए.टी.ए.वर अमेरिका आणि युरोपीय देश यांचा दबाव असल्याविना असा निर्णय होणे शक्य नाही !