इंदापूर (पुणे) पोलिसांकडून ५० लाखांचा गुटखा शासनाधीन !
इंदापूर (पुणे) – पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी देवकर गावाच्या हद्दीमध्ये १५ जून या दिवशी सोलापूरकडून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकमधील मानवी जीवनास अपायकारक ठरणारा आणि सरकारने बंदी घातलेला ४९ लाख ७५ सहस्र रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. रोकडा आणि बंदर या नावाचा हा गुटखा होता. इंदापूर पोलिसांनी ट्रकचालक आणि मालक यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
इंदापूर पोलिसांनी गुटख्यावर केलेली कारवाई ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई असली तरी इंदापूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात मात्र गुटखा खुलेआम विकला जातो, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक मुजावर यांनी इंदापूर शहरासह तालुक्यातील गुटखा विक्री बंद करून ‘इंदापूर गुटखा मुक्त करावे’, अशी मागणी ‘महाराष्ट्र व्यसनमुक्त युवक संघा’च्या वतीने करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|