नारायण राणे यांच्या अवैध बांधकाम प्रकरणात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाचा नकार !

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या अधिश बंगल्यामध्ये अवैध बांधकाम केले आहे. या प्रकरणी सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने (एम्सीझेडएम्ए) पाठवलेल्या नोटिशीविरोधात नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राणे यांची ही याचिका फेटाळून लावत किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सुनावणीस जाण्याचे आदेश दिला आहे. सागरी किनारा व्यवस्थापनाचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणी प्राधिकरणाने मुंबई महापालिकेच्या अहवालाच्या आधारे राणे यांना नोटीस बजावली होती.