मशिदीमध्ये चिथावणीखोर भाषण करू नये; म्हणून नोटीस बजावणार्या पोलीस अधिकार्याला पदावरून हटवले !
केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारचे कट्टरतावादी मुसलमानांविषयीचे प्रेम !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील कन्नूरच्या मय्यिल पोलीस ठाण्याचे प्रमुख बीजू प्रकाश यांना केरळच्या साम्यवादी सरकारने पदावरून हटवले आहे. बीजू प्रकाश यांनी कन्नूर येथील जामा मशिदीमध्ये दोन धर्मांत द्वेष पसरवणारे भाषण देण्यात येऊ नये, यासाठी मशिदीला नोटीस बजावली होती. त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले. सरकारने स्पष्ट केले आहे, ‘राज्यातील कोणत्याही मशिदीमधून धार्मिक दुष्प्रचार करण्यात येत नाही. जामा मशिदीला बजावण्यात आलेली नोटीस अयोग्य आहे. सरकारच्या धोरणाच्या हे विरोधात आहे.’ मुख्यमंत्री कार्यालयाने याविषयी एक प्रसिद्धीपत्रक काढून याची माहिती दिली आहे.
१. नूपुर शर्मा यांच्या विधानावरून देशभरात मुसलमानांकडून नमाजानंतर हिंसाचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर जामा मशिदीच्या शुक्रवारच्या नमाजानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बीजू प्रकाश यांनी नोटीस बजावून नमाजाच्या वेळी चिथावणीखोर भाषण करू नये. कुणी तसे केले, तर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते.
२. या नोटिसीनंतर मुस्लिम लीग आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांनी विरोध चालू केला. मुस्लिम लीगचे कन्नूरचे जिल्हा सरचिटणीस अब्दुल करीम चेलेरी यांनी मुख्यमंत्र्यांना याविषयी सरकारचे धोरण स्पष्ट करण्यास सांगितले. तसेच कन्नूरच्या पोलीस आयुक्तांकडे बीजू प्रकाश यांच्याविषयी तक्रार केली. यानंतर नोटीस मागे घेऊन बीजू प्रकाश यांना पदावरून हटवण्यात आले. तसेच त्यांना या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली.
संपादकीय भूमिका
|