गिरिडीह (झारखंड) येथे हिंसाचारी मुसलमानांऐवजी हिंदूंवरच होणार्या कारवाईमुळे हिंदू पलायन करण्याच्या सिद्धतेत !
गिरिडीह (झारखंड) – येथील पंचाबामधील हटिया मार्गावर १२ जून या दिवशी छेडछाडीच्या घटनेनंतर मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण करण्यात आले होते. त्यानंतर आता येथील १५० हून अधिक हिंदूंनी त्यांची घरे आणि दुकाने विकण्याचे फलक लावले आहेत. पोलिसांनी आक्रमणाच्या प्रकरणी हिंदूंवर एकतर्फी कारवाई चालू केल्याने हिंदूंनी पलायन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
Jharkhand: ‘On sale’ posters come up outside almost 150 Hindu shops and houses after stone-pelting incident in Giridih, locals allege police apathyhttps://t.co/ojMWlkYtAr
— OpIndia.com (@OpIndia_com) June 16, 2022
१. स्थानिक हिंदूंचे म्हणणे आहे की, मुसलमानांकडून सातत्याने हिंदूंच्या मुलींची छेड काढली जाते, हिंदूंच्या घरांवर दगडफेक केली जाते. जर कुणी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, तर हिंदूंवरच गुन्हा नोंदवला जातो. यामुळे येथील हिंदू त्रस्त झाले आहेत. आरोपी मोकाट आहेत आणि निरपराध्यांना कारागृहात टाकले जात आहे. याविरोधात १५ जून या दिवशी धरणे आंदोलनही करण्यात आले. दगडफेक करणार्यांवर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे.
२. पोलिसांनी हिंदूंचे आरोप फेटाळले आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. (हास्यास्पद स्पष्टीकरण देणारे झारखंड पोलीस ! कुणी स्वत:चे घरदार सोडण्याचा टोकाचा विचार कशाला करील ? त्यामुळे हिंदूंवर एकतर्फी कारवाई करून त्यांना पलायन करण्यास भाग पाडणार्या अन्याय्य पोलिसांवर त्यांच्या वरिष्ठांनी कठोर कारवाई करायला हवी, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक) या घटनेतील अन्य आरोपींनाही अटक करण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकाझारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्याने हिंदूंनाच आरोपी ठरवले जात आहे. केंद्र सरकारने अशा घटनांमध्ये हस्तक्षेप करून हिंदूंना न्याय देण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असेच हिंदूंना वाटते ! |