नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्या अभाविपच्या कार्यकर्त्यास अटक
कोईंम्बतूर (तमिळनाडू) – नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणार्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते कार्ती (वय २४ वर्षे) यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्या केलेल्या कथित अवमानाचा व्हिडिओ प्रसारित करून त्याखाली ‘मी हे (नूपुर शर्मा जे म्हणाल्या ते) प्रतिदिन म्हणीन. जे लिहिले आहे, तेच नूपुर शर्मा बोलल्या आहेत. त्या चुकीचे काय बोलल्या ?’, असे लिहिले होते. यावर पोलिसांनी कार्ती यांच्या या पोस्टमुळे दोन समाजांत तेढ वाढण्याची शक्यता असल्याचे सांगत कार्ती यांच्याविरुद्ध ‘भा.द.वि.’च्या कलम १५३ (अ) आणि ‘आय.टी.’ कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हा नोंदवला. यासह पोलिसांनी कार्ती यांची वरील पोस्टही सामाजिक माध्यमांतून काढून टाकली आहे. पोलिसांनी कार्ती यांना न्यायालयात उपस्थित केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
Tamil Nadu: Police arrest 24-year-old ABVP activist Karthi for sharing FB post in support of Nupur Sharma, charge him for promoting religious enmityhttps://t.co/MAbie9lQPZ
— OpIndia.com (@OpIndia_com) June 16, 2022
संपादकीय भूमिकापोलीस अशीच तत्परता हिंदु धर्म, देवता, संत, राष्ट्रपुरुष आदींचा अवमान होतो, तेव्हा दाखवतात का ? |