एकतर्फी प्रेमातून हिंदु मुलीवर आक्रमण करणाऱ्या धर्मांधाला सश्रम कारावास !

नागपूर, १५ जून (वार्ता.) – येथील महादुला परिसरातील एकतर्फी प्रेम प्रकरणात मुलीला त्रास देणाऱ्या शाहरूख शेख फिरोज शेख (वय २४ वर्षे) याला विशेष सत्र न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मुलीचा विरोध असतांनाही त्याने सतत ३ वर्षे तिला त्रास दिला आणि शेवटी हत्या करण्याच्या उद्देशाने तिच्यावर चाकूने वार केले; मात्र तो वार मुलीने हातावर झेलल्याने तिला रक्तस्राव होऊ लागला. न्यायमूर्ती एस्.आर्. त्रिवेदी यांनी हानीभरपाई म्हणून मुलाला ५ सहस्र रुपयांचा दंड भरण्याचा आदेश दिला. अधिवक्ता कल्पना पांडे यांनी सरकारच्या वतीने काम पहातांना विविध पुराव्यांच्या आधारे अनेक गुन्हे सिद्ध केले.