मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण

पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर

मुंबई – पंढरपूरच्या ‘विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती’च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा शासकीय निवासस्थानी १० जुलै या दिवशी असलेल्या आषाढी एकादशीच्या विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. या वेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी, तसेच परिसराच्या विकासकामांसाठी आवश्यक निधी अल्प पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. मंदिर समितीच्या वतीने ह.भ.प. औसेकर महाराज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा श्री विठ्ठलाची मूर्ती, वीणा, शेला-पागोटे देऊन सत्कारही केला.

पंढरपूर मंदिर परिसरातील विविध विकासकामांसाठी शासनाने ७३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याअंतर्गत कामांविषयी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चा केली. अशा पद्धतीने निधी देण्याचे घोषित करून, तो लगेचच उपलब्ध करून दिल्याविषयी समितीने समाधान व्यक्त केले.