अधिवेशनस्थळी लावलेले बंगाली हिंदूंवरील अत्याचारांविषयीचे प्रदर्शन पाहून हिंदुत्वनिष्ठांचे डोळे पाणावले !
बंगाल येथील ‘पश्चिमबंगेर जन्य’ या संघटनेने वर्ष १९४६ ते १९७१ या कालावधीत बंगाली हिंदूंच्या झालेल्या नरसंहाराची भीषणता दाखवणारे एक विशेष छायाचित्रमय प्रदर्शन सिद्ध केले आहे. २६ छायाचित्रांचे हे प्रदर्शन विद्याधिराज सभागृहात लावण्यात आले आहे. या प्रदर्शनात शांतीप्रिय बंगाली हिंदूंवर कशाप्रकारे अत्यंत घृणास्पद अत्याचार करण्यात आले, हे दाखवण्यात आले आहे. ‘बंगाली हिंदूंवर झालेले अत्याचार लोकांसमोर आणणारे हे पहिलेच प्रदर्शन आहे’, असे ‘पश्चिमबंगेर जन्य’ या संघटनेने सांगितले. हे प्रदर्शन पाहून अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या डोळ्यांत पाणी आले.