पुण्यातील ३ सहस्र ५०० गुंडांकडून पिस्तुले, काडतुसे, शस्त्रसाठा जप्त ! – गुन्हे शाखेची विशेष मोहीम
पुणे – शहरातील गुंडांची झाडाझडती घेण्यासाठी गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यांमधील पथकांनी विशेष मोहीम राबवली. या कारवाईत पोलिसांनी शहरातील ३ सहस्र ५०० गुंडांकडून पिस्तुले, काडतुसे, तलवारी, कोयते आदी साहित्य शासनाधिन केले. चंदननगर येथील एका हुक्का पार्लरवरही कारवाई केली. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी, तसेच गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम राबवली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, वाहतूक शाखेचे उपायुक्त आदींच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, तसेच स्थानिक पोलीस ठाण्याची पथके या मोहिमेत सहभागी झाली होती.
संपादकीय भूमिकापुण्यात शस्त्रसाठा कुठून आला ? शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणे आवश्यक ! |