शिकाऊ आधुनिक वैद्यांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने महिलेला डोळा गमवावा लागला !
मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार !
मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात शिकाऊ आधुनिक वैद्यांनी चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे ५८ वर्षीय महिलेला तिचा डोळा गमवावा लागला. अंधेरी येथील रमिला पुरुषोत्तम वाघेला यांना मोतीबिंदू झाला होता. त्याच्या शस्त्रकर्मासाठी त्या रुग्णालयात भरती झाल्या होत्या. या प्रकरणी तिच्या मुलाने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
शिवसेना नेते इंतेखाब फारुकी यांनी पीडित कुटुंबियांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांनी जुहू पोलिसांकडे मागणी केली की, संबंधित दोषी आधुनिक वैद्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा पीडित कुटुंबियांसमवेत रुग्णालयाच्या बाहेर जोरदार आंदोलन केले जाईल. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबियांनी प्रचंड संताप व्यक्त केला. महिलेला देण्यात आलेल्या इंजेक्शनचे नमुने पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयाकडून या प्रकरणाची चौकशी चालू आहे.
संपादकीय भूमिकाइंजेक्शन देण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या आधुनिक वैद्यांना बडतर्फच करायला हवे ! |